‘मिस्टर ५६ इंच’समोर उभे ठाकण्याची पत्रकारांमध्ये धमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘मिस्टर ५६ इंच’ यांच्यासमोर उभे ठाकण्याची आणि सत्यासाठी लढण्याची धमक काही पत्रकारांमध्ये आहे. याचा आपणास अभिमान वाटतो, असे ‘ट्विट’ करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज निशाणा साधला. ‘राफेल डील’च्या प्रकरणात सत्याच्या बाजूने काही पत्रकार निर्भयपणे लढत आहेत. मात्र सर्वोच्च नेत्याच्या खासमखास माणसांकडून त्या पत्रकारांना आता ‘माघार घ्या, अन्यथा…’ असे धमक्यांचे मेसेज पाठवले जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरवर केला आहे. मोदी सरकारने ‘राफेल डील’ प्रकरणात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सचा ४ अब्ज डॉलर्सचा फायदा करून दिला, असा आरोप राहुल गांधी यांनी याआधी लोकसभेत अंबानी यांचे नाव न घेता केला होता.