
अभय मिरजकर, लातूर
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनात जवळपास १०० मराठा आरक्षण आंदोलक सहभागी झाले आहेत. हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी आधीच जाहीर केले होते.

पोलिसांनी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन होऊ नये म्हणून हे घर संभाजी पाटील-निलंगेकर यांचे नसून त्यांच्या भावाचे आहे असं सांगितलं. यावर आंदोलकांनी मग पालकमंत्री लातुरात आल्यावर काय भाड्याने राहतात काय असा सवाल विचारला. आंदोलकांनी यावेळी निलंगेकर-पाटील यांच्यासोबतच इतर मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने बोंब ठोकत घोषणा दिल्या. घरासमोर आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड लावत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.




























































