
विजय जोशी । नांदेड
नांदेड शहरानजिक बोंढार शिवारात एका २५ ते २७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला असून त्या मुलीला जाळून मारल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या एका घटनेत तळणी शिवारात उद्धव सूर्यवंशी (३५) या नागरिकाचा मृतदेह आढळून आला आहे.
नांदेड शहरानगजिक बोंढार शिवारात एका २५ ते २७ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला असून सदर मुलीला जाळून मारल्याची माहिती पुढे येत आहे. मुलीच्या मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या अंगावर काही ठिकाणी जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्रामिण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून या घटनेचा पोलीस सखोल तपास करीत आहेत. दुसऱ्या एका घटनेत नांदेड तालुक्यातील तळणी शिवारात उद्धव सूर्यवंशी या नागरिकाचा मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी सकाळी रनींग करणाऱ्या मुलांना हा मृतदेह दिसल्याने त्यांनी गावकरी व पोलिसांना कळवले. सदर व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकला असावा असा पोलिसांना संशय आहे.






























































