मराठा आरक्षणासाठी मंगरूळ येथे आमरण उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर, नांदुर्गा

औसा तालुक्यातील मंगरूळ येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोहर आनंदराव पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. हे उपोषण ३० जुलै २०१८ पासून सुरू असून आजपर्यंत चालूच आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

उपोषण थांबवण्यासाठी औसा येथील पोलीस उपविभागीय आधिकारी डीवायएसपी केंद्रे व किल्लारी पोलीस ठाण्याचे एपीआय आदींनी भेट देऊन उपोषण मागे घेण्यास निवेदन केले होते. मात्र, जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात शासन ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत उपोषण अशाच पद्धतीने सुरू राहील, असे पाटील यांनी दैनिक सामनाशी बोलताना स्पष्ट केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाटील यांनी अन्नसेवन न केल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.