मधुमेह तज्ज्ञ डॉ. नीळकंठ तळवलकर यांची आज जन्मशताब्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dr-nilkanth-talwalkar

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ म्हणजे स्वर्गीय डॉ. नीळकंठ तळवलकर (एन्. जी. तळवलकर) यांची आज ५ ऑगस्ट २०१८ रोजी जन्मशताब्दी. डॉ. एन्. जी. तळवलकर मुंबईतील तळवलकर या समृद्ध वैद्यकीय कुटुंबातील एक अग्रणी नाव. वैद्यकीय़ क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही महत्वाचे मानले जाते.

डॉ. निळकंठ तळवलकर यांचा जन्म दि. ५ ऑगस्ट, १९१८ रोजी झाला होता. तळवलकर कुटुंब म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. तळवलकरांच्या कुठलाही खंड न पडता सलग सात पिढ्या कार्यरत राहिल्या असून त्यातली सातवी पिढी अगदी आजही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. डॉ. नीळकंठ तळवलकर मुंबईतील मधुमेह तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध होतेच पण या क्षेत्रातील अत्यंत आदराने घेतले जाणारे एक नाव होते. मुंबई मधील रहेजा हॉस्पिटलचे डॉ. तळवलकर प्रमुख प्रवर्तक होते.

 वयाच्या ८१ व्या वर्षी दि. २३ नोव्हेंबर १९९९ रोजी डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे निधन झाले. पण आजही वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप तशीच टिकून आहे. आजच्या त्यांच्या जन्मशताब्दी पूर्ती निमित्त त्यांना आदरांजली.

summary: birth centenary of dr neelkanth talwalkar