
सामना ऑनलाईन । मुंबई
आरोग्य सेविकांनी गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू केलेले आंदोलन आज कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय मागे घेण्यात आले. आरोग्य सेविकांच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी पालिकेत बैठक बोलावण्यात येईल असे पोकळ आश्वासन देऊन हजारो आरोग्य सेविकांवर संप मिटवण्यासाठी दबाव आणण्यात आला.
रविवार ५ ऑगस्ट रोजी पोलिओ मोहीम होणार असून आरोग्य सेविकांचा संप सुरू राहिला असता तर ही मोहीम कोलमडून पडली असती. त्यामुळे हा संप मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला असल्याची भावना आरोग्य सेविकांमध्ये निर्माण झाली आहे. आरोग्य सेविकांच्या वेतनाचा प्रश्न हा आर्थिक बाबीशी निगडित असल्यामुळे त्याला वेळ लागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे मंगळवारी होणार्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.























































