
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधीपक्षांच्या एकतेचा नारा देणारे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी विरोधीपक्षांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी ममता बॅनर्जी किंवा मायावती यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांनी पुरुष उमेदवार पंतप्रधानपदासाठी घोषित करण्याएवजी ममता बॅनर्जी किंवा मायावती यांचे नाव पुढे केल्यास भाजपवर मात करण्यात त्याचा फायदा होईल असे मतही नोंदवले.
First, Congress said Rahul Gandhi will be PM candidate. A PTI correspondent said Congress will propose Mamata Banerjee or Mayawati as PM candidate as they want a woman candidate, I told the journalist, I will have no problem with it: Former PM & JDS leader HD Deve Gowda pic.twitter.com/VQdyk8qhQZ
— ANI (@ANI) August 6, 2018
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षांची एकतेत फूट पडू नये, यासाठी हा निर्णय निवडणुकानंतर घेण्याबाबत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची सहमती झाली असतानाच देवेगौडांनी हे विधान केले आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकाही काँग्रेससोबत लढण्याचे देवेगौडांनी जाहीर केले आहे.
भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी बनवण्यासाठी ममता बॅनर्जी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. बॅनर्जी या आघाडीसाठी सर्व शक्ती पणाला लावत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीसोबत आहोत. निवडणुकांपर्यंत ही आघाडी भाजपसमोर मोठे आव्हान उभे करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, त्यासाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारासह इतर मतभेद पक्षांनी बाजूला सारून भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच या आघाडीत काँग्रेसला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
























































