नोकऱ्या कुठे आहेत? हेच देश विचारतोय, राहुल गांधींचा गडकरींना चिमटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मराठा समजाला आरक्षण देऊनही काहीच फायदा नाही. कारण आज नोकऱ्या आहेतच कुठे? असे वक्तव्य मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वक्तव्यावरून गडकरी यांना चांगलेच कोंडीत पकडले. आपण चांगला आणि योग्य प्रश्न विचारला आहे, गडकरीजी, आज प्रत्येक हिंदुस्थानींना हाच प्रश्न पडला आहे नोकऱ्या आहेत कुठे? तसेच काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर ‘.#WhereAreTheJobs?’ असा हॅशटॅग ट्वीट करण्यात आला. या ट्विटला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून हजारो नेटकऱ्यांनी हे रिट्विट केले आहे.

दरम्यान, गडकरी यांनी गरीबांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. आपल्याला कोणालाही दुखवायचे नव्हते. गरीबी हा आता राजकीय मुद्दा बनला आहे, असे माझे मत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आज प्रत्येकजण आपण गरीब असल्याचे सांगतो. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मण समाज राजकारणात आहे. त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. मात्र, ते स्वतःला गरीब समजतात, असेही ते म्हणाले.