
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे –
महिला आघाडी संपर्क संघटक व सहसंपर्क संघटक
शिवसेना संपर्क संघटकपदी माधुरी मांजरेकर (राजापूर – कोदवली, सागवे, देवाचे गोठणे), समीक्षा सक्रे (राजापूर -पाचल, केळवली, ओणी), सविता आरोलकर (मालवण) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, तर सहसंपर्क संघटकपदी स्नेहल महाडिक (दापोली), स्नेहा कदम (वैभववाडी) यांची नियुक्ती केली आहे.
वाशीम जिल्हाप्रमुख
वाशीम जिह्याकरिता शिवसेना जिल्हा प्रमुखपदी सुरेश मापारी (विधानसभा – रिसोड, वाशीम, कारंजा) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख
चंद्रपूर जिह्याच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी आमदार सुरेश (बाळू) धानोरकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सुरेश सावंत यांच्या चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुखपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
मुंबई विभाग क्र. ८ मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. ८ मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा समन्वयकपदी हाजी फैजल अमिन (घाटकोपर पश्चिम विधानसभा), सचिन गायकवाड (घाटकोपर पूर्व विधानसभा), सुफी महम्मद शेख (मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
‘शिव व्यापारी सेना’ या संघटनेचा शिवसेना पक्षाशी कोणताही संबंध नाही
चिंटू शेख अध्यक्ष असलेल्या ‘शिव व्यापारी सेना’ या संघटनेचा शिवसेना पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

























































