नगरमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्‍हा परिषदे अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालावधी पासून शासन स्‍तरावर प्रलंबित असलेल्‍या मागण्‍या मान्‍य होत नसल्‍यामुळे मंगळवार ७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा परिषद कर्मचारी युनियनची सभा सुभाष कराळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा परिषद सभागृहात सोमवारी पार पडली होती. जिल्‍हा परिषद कर्मचाऱ्यांच्‍या विविध मागण्‍याच्‍या संदर्भाने राज्‍य शासनाकडे राज्‍य शाखेने केलेल्‍या चर्चेनुसार व अनेकवेळा निवेदन देऊनसुद्धा जिल्‍हा परिषद कर्मचाऱ्यांच्‍या मागण्‍यांबाबत शासन कोणतीच कार्यवाही करत नसल्‍यामुळे जिल्‍हा परिषद कर्मचाऱ्यांमध्‍ये असंतोषाची भावना आहे. याबाबत बैठकीमध्‍ये सविस्‍तर चर्चा झाली आहे. जिल्‍हा परिषद कर्मचाऱ्यांच्‍या एकूण २३ प्रलंबित मागण्‍या संदर्भाने शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

या संपामध्‍ये जिल्‍हा परिषद कर्मचारी युनियन ४३४० चे जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्‍य केंद्रात काम करणारे सर्व सभासद कर्मचारी सहभागी झाले आहेत.