
सामना ऑनलाईन । चेन्नई
द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुत्राशयाचा आजाराने ते त्रस्त होते. आठवडाभरापूर्वी त्यांना चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु मंगळवारी त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे थांबवले आणि सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या निधानामुळे तमिळ जनता शोकाकूल झाली असून रुग्णालयाबाहेर समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
#FLASH M Karunanidhi passes away, Kauvery hospital releases statement pic.twitter.com/gUpZgYnPiY
— ANI (@ANI) August 7, 2018
मुत्तुवेल करुणानिधी यांचा जन्म ३ जून, १९२४ रोजी तिरुक्कुवलई येथे झाला. १४ व्या वर्षी राज्यात हिंदीविरोधी आंदोलन केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपट क्षेत्राकडे वळवला. तमिळ चित्रपटक्षेत्रात त्यांनी एक पटकथा लेखक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. ‘पराशक्ती’ नावाच्या एका चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी द्रविड आंदोलकांची विचारधारा तामिळनाडूतील जनतेपर्यंच पोहोचवली. सुरुवातीला या चित्रपटावर बंदी आणली गेली परंतु १९५२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि सुपरहिट ठरला. तसेच ‘पनाम’ आणि ‘थंगारथनमथी’ या चित्रपटातही त्यांनी सामाजिक विषयांची मांडणी केली. समाजप्रबोधनासाठी चित्रपट आणि नाटकांचा वापर करणारे करुणानिधी एक होते.
द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास प्रचंड मोठा आहे. आपल्या ९७ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जवळपास ७८ ते ८० वर्ष राजकारणामध्ये घालवली. करुणानिधी यांचा फक्त तामिळनाडूच नाही तर देशाच्या राजकारणावरही मोठा प्रवाभ पाडला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी हिंदीविरोधात आंदोलन उभारून आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. समाजातील तळागाळाच्या लोकांसाठी त्यांनी विशेष काम केले. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१ आणि २००६-११ या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली.
Deeply saddened by the passing away of Kalaignar Karunanidhi. He was one of the senior most leaders of India.
We have lost a deep-rooted mass leader, prolific thinker, accomplished writer and a stalwart whose life was devoted to the welfare of the poor and the marginalised. pic.twitter.com/jOZ3BOIZMj
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2018
रजनिकांत यांनी व्यक्त केले दु:ख
करुणानिधी यांच्या निधनावर दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी रजनिकांत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. माझ्या आयुष्यातील हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Today is a black day in my life, one which I can never forget as I lost my #Kalaignar. I pray for his soul: Rajinikanth on #Karunanidhi (file pic) pic.twitter.com/R8ociRQSsN
— ANI (@ANI) August 7, 2018
summary- DMK president M Karunanidhi passed away in chennai kauvery hospital




























































