आरक्षणासाठी धनगर समाजाचा मेंढ्यासह रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नळदुर्ग

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवार, ८ ऑगस्ट रोजी पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मेंढ्या घेऊन धनगर समाजातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत धनगर समाजातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मेंढ्यांना रस्त्यावर आणून उभे करण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या या मोर्चापूर्वी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जानकर, पडळकर यांची भाषणे झाली.

दुपारी पावणेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाला सुरवात केली. दीड तास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजिवन मिरकले यांना मागण्यांचे निवेदन दिले.

summary…dhangar samaj protest for reservation