जिल्हाधिकारी, कृषी अधिकार्‍यांच्या तत्परतेमुळे ८४ गावातील बोंडअळी नियंत्रणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील ८४ गावात १.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापुस पीक धोक्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यतत्परतेमुळे बोंडअळी नियंत्रणात आणण्यात कृषी विभागाला यश आले आहे. मागीलवर्षी शेंदरी बोंडअळीमुळे कापुस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यावर्षीही महिन्याभरापासून जिल्ह्यातील ८४ गावात कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे व जिल्हा कृषी अधिक्षक एन. एम. नाईक यांनी तात्काळ उपाययोजना केल्यामुळे शेंदरी बोंडअळीचा प्रादर्भाव नियंत्रणात आला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांनी गावागावात जाऊन पाहणी करुन अधिकारी कर्मचार्‍यांच्या कार्यशाळा घोतल्या. शेतकर्‍यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. उपाययोजना म्हणून कामगंध सापळ्याची उभारणी केली. त्याचबरोबर जिल्ह्यात ७०३४ लिटर क्लोरोपायरीफॉस व एक वेळेस निंबोळी अंक याची अदलून बदलून फवारणी केली. त्याचबरोबर लाईटटॅप लावले. यासाठी ४८१ अधिकारी कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच शेंदरी बोंडअळी नियंत्रणात आली आहे.

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली गावे

  • बुलढाणा तालुक्यात मासरुळ
  • चिखली तालुक्यात वैरागड
  • देऊळगावराजा तालुक्यात गोंधनखेड, नांगनगाव, बायगाव बु., निमगाव गुरु, टाकरखेड भागिले, शिवणी आरमाळ, रोहणा, देऊळगावमही, सावंगी टेकाडे, सुरा, निमगाव गुरु, निमखेड, गिरोली बु., वाकी, सावंगी टेकाडे, निमगाव गुरु, सिनगाव जहाँगीर
  • सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळगाव लेंडी, लिंगा, उगला, निमखेड कसबा, चांगेफळ, चिंचोळी, खैरव, विझोरा, चांगेफळ
  • मेहकर तालुक्यात नायगाव दत्तपूर, दुर्गबोरी, हिवरा साबळे, मोहदरी
  • खामगाव तालुक्यात निंभारी, उमरा अटाळी, रामनगर, देऊळखेड, घारोळ, शहापूर, कारेगाव बु.
  • शेगाव तालुक्यात चिंचोळी
  • संग्रामपूर तालुक्यात चांगेफळ बु., खेळमाळी पातोंडा, खेळमाळी पातोंडा, पिंपरी आडगाव
  • जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव, खेर्डा खुर्द, आसलगाव, वायाळ, निंबोरा बु., खेर्डी बु., खेर्डी ख
  • नांदुरा तालुक्यात काटी, वडनेर, मेंढळी, पिंपळखुटा, औरंगपुरा
  • मोताळा तालुक्यात गोतमारा, पान्हेरा खेडी, राजूर, कुर्‍हा, सिंदखेड, जयपूर, खंडवा, राजूर, रामगाव, धामणगाव बढे, कोथळी, राजूर, रोहीणखेड, शेलापूर बु., धामणगाव बढे, तपोवन, टाकळी
  • मलकापूर तालुक्यात धरणगाव, सावळी, भालेगाव, कुंड बु., म्हैसवाडी, वरखेड, धोडी, तालसवाडा, तेलखेड, जलालाबाद