दलितांचा सफाया हेच मोदींचे धोरण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकताच दलितविरोधी असून दलितांचा सफाया हेच त्यांचे धोरण राहिलेले आहे असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदी यांच्यावर येथे चढवला.

अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिलेल्या एका निकालाद्वारे शिथिल केला होता. मोदी सरकारच्या त्या निर्णयाविरोधात ‘ऑल इंडिया आंबेडकर महासभा’ या बॅनरखालील अनेक दलित संघटनांनी आज ‘बंद’ची हाक दिली होती. त्याचाच भाग म्हणून आज जंतरमंतरवर निदर्शने केली. त्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी भेट देऊन दलितांच्या लढय़ाला पाठिंबा दिला. माकपचे नेते सीताराम येच्युरी यांनीही त्या आंदोलनात भाग घेतला. भाजप जेव्हा कधी कुठेही सत्तेवर येतो तेव्हा दलितांना जागोजागी अमानुषपणे झोडपले जाते, त्यांना चिरडले जाते असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, मोदींच्या अंतःकरणात दलितांना काही स्थान असते तर त्यांच्या सरकारचे व भाजपचे धोरण आणि वर्तन निराळे असते.