मध्य रेल्वेच्या मोटरमनचा संप मागे, प्रवाशांचे हाल मात्र कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या मोटरमननी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी संपामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल मात्र कायम असून अनेक स्थानकांवर गर्दी दिसून येत आहे. नेहमीच्या गर्दी नसलेल्या वेळीही स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

ना बिघाड, ना रुळाला तडे असं असताना देखील शुक्रवार सकाळपासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती. अनेक गाड्यांच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या. ओव्हर टाईममुळे कामाचा ताण पडत असल्याने मोटरमनने संप पुकारला होता. त्यानंतर प्रवाशांना हाल सहन करावे लागले. अखेर मोटरमन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

police-protection01

लाल सिग्नल चुकविल्यास सेवेतून मुक्त केले जाते, ही कारवाई कमी करण्यात यावी अशी मागणी मोटरमनने केल्या आहेत. तसेच सध्या ६७१ मोटरमन सेवेत असून तब्बल २७१ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

old-local01

Discussion between the Staff side and Administration has just concluded and the matter has been amicably resolved says Sunil Udasi, CPRO Central Railway.