1 / 6
जगातील सर्वात खतरनाक पूलांमध्ये प्रथम क्रमांक लागतो तो चीनच्या झांगजियाजी प्रांतात बनलेल्या काचेच्या पूलाचा. १०० मीटर लांबीच्या पूलाच्या बाजूला उंच पर्वतरांगा आहेत तर खाली पाहिल्यास ३०० मीटर खोलीची दरी. त्यामुळे पूलावरून चालणे आव्हान आहे.
पाकिस्तानच्या हुसैनी पूलावरून चालणे म्हणजे साहसी खेळांमधील धोकादायक टास्क पूर्ण करण्यासारखे आहे. काही काठ्या रस्सीने बांधून बनवलेला हा पूल अनेकांना धाडसाची परीक्षा घेण्यासाठी आकर्षित करतो.
चीनमधील सिदुहे नदीवरील पूल जगातील सर्वात उंच पुलांपैकी एक आहे. जमीनीपासून ४६० मीटरच्या उंचीवर असणार हा पूल शांघाय आणि चेंदो शहरांना जोडणाऱ्या पूलाची लांबी १३०० मीटर आहे.
जपानच्या एशिमा शाशी पूल मैत्स्यु आणि कासाईमेनिटो या शहरांना जोडतो. या पूलाची चढण आणि उतरणीमुळे वाहनचालकांना धडकी भरते. नाकाऊमी नदीजवळ या पूलाखालून जहाज सहज जाऊ शकते, एवढी त्याची उंची आहे.























































