
सामना प्रतिनिधी। लातूर
धनगर समाजास अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी रविवारी लातूर तालूक्यातील मौजे ममदापूर येथे लातूर – नांदेड राज्यमार्गावर शेळ्या, मेंढ्यासह धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजास अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, धनगर समाज अनुसूचित जमात म्हणून अंमलबजावणी करावी, सोलापूर येथील विद्यापीठास पु.अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. लातूर नांदेड रोडवरील ममदापूर पाटी येथे शेळ्या, मेंढ्यासह रस्त्यावर ठिय्या मारला. यावेळी रमेश सुरवसे, आदिनाथ मुळे, हरिदास होपळकर, धनंजा भंडारे, विजय भंडे, संभाजी सुळ यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
summary…dhangar protest for reervation

























































