छत्तीसगडमध्ये जन्माले आले पाच दात असलेले बाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। रायपूर

छत्तीसगडमधील बलरामपूर येथे कोटरगी गावात विचित्र घटना घडली आहे. या गावात एका महिलेने जन्मत: पाच दात असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. जन्मत: पाच दात असलेले बाळ बघून डॉक्टरही चक्रावले आहेत. या बाळाचा जन्म म्हणजे वैद्यकीय विश्वाला आव्हान असल्याचे बोलले जात आहे. गावातल्यांनी मात्र या बाळाच्या रुपात कुणा थोर पुरुषाचा पुनर्जन्म झाल्याचे घोषित केले आहे.  बाळाच्या आईचे नाव सोनहत आहे. तिची प्रकृती उत्तम असून बाळाची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोनहतला शनिवारी प्रसूती कळा सुरू झाल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण ज्यावेळी नर्स मुलाचे तोंड स्वच्छ करत होती. तेव्हा तिला बाळाच्या तोंडात एक दोन नव्हे तर चक्क पाच दात असल्याचे दिसले. ते बघून नर्सला धक्काच बसला. कारण जन्मत: कुठल्याही बाळाला दात नसतात. यामुळे नर्सने याबद्दल तात्काळ डॉक्टरांना कळवले. बाळाचे दात बघून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. ही सामान्य बाब नसल्याने डॉक्टरांनी बाळाच्या अनेक तपासण्याही केल्या पण त्या सर्व नॉर्मल आल्या. यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. दरम्यान, पाच दातांचे बाळ जन्माला आल्याचे वृत्त गावात पसरताच संपूर्ण गावकऱ्यांनी हे अजब बाळ बघण्यास रुग्णालयात एकच गर्दी केली. काहीजणांनी शैतान जन्माला आल्याचे घोषित केले तर काहीजणांनी हे बाळ नसून तो एक महान पुरुषाचा पुनर्जन्म असल्याचे जाहीर केले. यामुळे लोकांचे जत्थेच्या जत्थे हार फुले घेऊन रुग्णालयात या चमत्कारी बाळाला बघण्यासाठी येऊ लागले आहेत. यामुळे डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात हलवले असून आत येण्यास सगळ्यांना मनाई केली आहे.

summary…in chattisgarh baby born with fice teeth