
सामना प्रतिनिधी । नगर
‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा जोरदार घोषणा देत धनगर समाजाने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून आरक्षणाबाबत आवाज उठवला आहे. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजी केली.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सर्वत्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सर्व महामार्गांवर विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळासाठी सर्वत्र झाली होती आरक्षण मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा सरकारने केली होती. आज चार वर्षे उलटून गेले तरीही हे आरक्षण देण्यात आले नाही ही बाब यावेळी बोलून दाखवण्यात आली. शहरांमध्ये आज धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

























































