
उदय जोशी, बीड
बीड जिल्ह्यात चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली असून दिवसाही घरफोड्या होऊ लागल्या आहेत. कहर म्हणजे सोमवारी रात्री आडस येथे एकाच रात्री सहा दुकाने आणि एक टपरी फोडून चोरट्याने रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
केज तालुक्यातील आडस हे ग्रामीण भागातील व्यापारी केंद्र असल्याने पंधरा ते वीस गावाचा संपर्क या गावाशी असतो. या गावात आठवडा बाजारही मोठा भरतो. सोमवारी रात्री इथली सहा दुकाने आणि एक टपरी चोरट्याने फोडली आहेत. दुकाने फोडून गल्ल्यातील रोख रक्कम आणि सामान चोरीला नेल्याने आडस गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.




























































