पाहा व्हिडीओ: महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर फडकला तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर बुधवारी तिरंगा फडकवून आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. ‘360 एक्सप्लोरर ग्रुप’ने ही आगळी वेगळी मोहीम मोठ्या जिद्दीने पार पाडली आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचा हा ग्रुप आहे.

हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दुर्गप्रेमिंनी एक आगळी वेगळी मोहीम आखत, कळसुबाई शिखर सर केलं. बुधवारी सकाळी चढाई सुरू करत हजारो फुट उंच असणाऱ्या कळसूबाई गडाची अवघड चढाई करुन हा तिरंगा फडकवला आहे. या मोहिमेमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, बुलढाण्यासह संपूर्ण राज्यातून शेकडो तरुण- तरूणी सहभागी झाले होते.