अटल, अढळ, अचल, नित्य वाजपेयी – मुख्यमंत्री फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीत एम्समध्ये गुरुवारी निधन झाले. अटलजींच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘अटलजी गेले यावर अद्यापही विश्वास बसत नाही. त्याचे विचार नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे म्हणत फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.