ATM चे नवे नियम कळाले का? रात्री नऊ नंतर कॅश …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘ऑटोमेटेड टेलर मशीन’ (एटीएम-ATM) ज्याला आपण ‘ऑल किंवा एनी टाईम मनी’ असे म्हणतो ती मशीन आता बँकिंग व्यवहार करणाऱ्या लोकांची अत्यावाश्यक गरज बनली आहे. याच एटीएमबाबत सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार शहरी भागात रात्री नऊनंतर एटीएममध्ये कॅश भरली जाणार नाही आणि एका कॅश व्हॅनच्या सिंगल ट्रिपमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक रक्कम असणार नाही. तसेच कॅश व्हॅनवर तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हल्ला परतवून लावणे, गुन्हेगारांच्या गाड्यांचा पाठलाग करणे आणि धोक्यापासून कसे सावध रहावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार एटीएममध्ये कॅश जमा करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी आपले आधार व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. तसेच नव्या नियमांनुसार ग्रामीण भागामध्ये सायंकाळी सहानंतर एटीएममध्ये कॅश जमा केली जाणार नाही. तसेच सर्व कॅश व्हॅनमध्ये जीएसएम बेस्ड ऑटो डायलर सोबत सिक्यूरिटी आणि माटराईज्ड सायरन लावण्यात येईल. सर्व कॅश व्हॅनमध्ये सीसीटीव्ही आणि बंदुकांसह दोन सुरक्षारक्षक असणे आवश्यक असणार आहे. सुरक्षारक्षकांच्या बंदुकांची दोन वर्षातून एकदा टेस्ट फायरिंग केली जाईल आणि बुलेट्सही बदलल्या जातील.

सिक्यूरिटी अँड इंटेलिजेंस सर्विसेज (SIS) चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि फिक्कीचे प्रायव्हेट सिक्यूरिटी कमिटी के चेयरमन रितुराज सिन्हा म्हणाले की, ‘या नव्या नियमांची आम्ही काही काळापासून वाट पाहात होतो. यामुळे इंडस्ट्रीमध्ये आमुलाग्र बदल होईल.’