नांदेड मध्ये पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नांदेड

नांदेड मधील मुदखेड तालुक्यातील बोरगाव नाद्री येथील शेतकरी गुरुवारी सायंकाळी शेतातून घरी परत येताना नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. प्रभाकर नादरे (49) असून असं या शेतकऱ्याचे नाव असून त्याचा शोध सुरु आहे. बोरगाव नाद्री आणि अमरापुर दरम्यान असलेल्या नाल्याच्या पाण्यात प्रभाकर वाहून देल्याची माहिती मीळताच प्रशासनाकडून नाला व नदीकीनारी शोध सुरुमोहीम केला आहे, मात्र शुक्रवारी उशिरापर्यंत प्रभाकर नादरे यांच्याविषयी माहिती मिळाली नाही. अजूनही नाल्याला पूर सुरू आहे. नांदेड डिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अनेक ठीकाणी पावसाने मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरसद्रृष्य परिस्थिती आहे.