
सामना ऑनलाईन । लखनऊ
केंद्रातील मोदी सरकारने अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जसाच्या तसाच ठेवण्यासाठी संसद अधिवेशनात विधेयक मंजूर केले असतानाच भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी उघडपणे सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. दलित उमेदवार असलेल्या राखीव मतदारसंघांमध्ये बिगर दलित समाजाने मतदानावेळी सरळ ‘नोटा’चा वापर करावा. मग स्वतःच्या बळावर दलित कुठे पोहोचतात तेच पाहू या, असे आवाहन त्यांनी शुक्रवारी केले.
आमदार सुरेंद्र सिंह हे बरैया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. ‘ऍट्रॉसिटी ऍक्ट’ जैसे थे ठेवण्यासाठी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या सुधारित विधेयकाविरोधात आपण लवकरच मोहीम सुरू करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

























































