
सामना ऑनलाईन । मुंबई
ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामाहून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे ते मुलुंडदरम्यान रेल्वे रुळांवर अडथळा आला होता. रुळांवर कोणातरी दगड ठेवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा अडथळा आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी धीम्या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रंचड हाल झाले. ठाणे आणि मुलुंडदरम्यान रेल्वेमार्गावर आलेला अडथळा हटवण्यात आला असून वाहतूक सुरळीत होत आहे.























































