
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारपासून जर्मनीच्या दौऱ्यावर जात आहेत. परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पक्षात मोठे फेरबदल केले असून, अहमद पटेल यांना कोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे. आतापर्यंत कोषाध्यक्ष असलेले मोतीलाल व्होरा यांना महासचिव करण्यात आले असून, मीराकुमार यांना कार्यकारी समितीवर घेण्यात आले आहे. पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली.
आनंद शर्मा यांना पक्षाच्या परराष्ट्र धोरणविषयक समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी कर्णसिंह यांच्याकडे होती. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांना कार्यकारी समितीवर आमंत्रित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. लुईझिनो फलेरो यांना पूर्वोत्तर राज्यांचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
ह राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सांभाळल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल होतील, अशी चर्चा होती. प्रत्यक्ष फेरबदलाला आज मुहूर्त मिळाला. राहुल गांधी हे बुधवारपासून जर्मनीच्या दौयावर जात आहेत. त्यापूर्वी हा फेरबदल करण्यात आला. २०१९च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन राहुल यांनी काँग्रेसची भाकरी फिरवल्याचे मानले जात आहे.
ह काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल गांधींनी आपली टीम बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात काँग्रेस वर्विंâग कमिटीची कार्यकारिणी जाहीर करताना ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, दिाqग्वजय सिंह, जनार्दन द्विवेदी, सी. पी. जोशी यांना वगळले होते. त्यांच्या जागी नवीन चेहयांना संधी दिली आहे.
























































