व्हॉट्सऍपचे कार्यालय हिंदुस्थानात हवेच! सरकारने दिला ‘त्रिसूत्री’ दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

व्हॉट्सअ‍ॅपसह अन्य सोशल साइटस्वर खोट्या बातम्या व्हायरल झाल्यामुळे देशात अनेक हिंसक घटना घडत आहेत. या खोट्या बातम्यांचा स्रोत शोधण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत आणि हिंदुस्थानात कॉर्पोरेट कार्यालय उघडावे अशा सूचना वेंâद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअ‍ॅपला केल्या आहेत. रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ खिस डॅनियल यांच्याशी झालेल्या भेटीत व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल होणाया अफवा, खोट्या बातम्या आणि अश्लील मेसेजेस या सर्वांना आळा घालण्यासाठी तांत्रिक उपाय शोधण्यासही सांगितले आहे.

हिंदुस्थानी कायद्याचा भंग झाल्यास जबर दंड

व्हॉट्सअ‍ॅप अथवा अन्य सोशल साइटस्वरील अफवा पसरविणारे संदेश आणि वादग्रस्त मेसेजेसमुळे हिंसा घडल्यास त्या साइटस्ला जबर दंड केला जाईल असे बजावून प्रसाद म्हणाले, हिंदुस्थानी कायद्यांचा भंग होऊ नये याची दक्षता सोशल साइटस्नी घ्यायची  आहे. शिवाय प्रत्येक तक्रारीसाठी आम्हाला तुमच्याशी अमेरिकेत संपर्वâ करायला लावू नका. त्यासाठी हिंदुस्थानातच तुमचे कॉर्पोरेट कार्यालय उभारा आणि तक्रार निवारण अधिकारी नेमा.  प्रसाद यांच्या भेटीत फेसबुकचीही मालकी असलेल्या व्हॉटस्अ‍ॅपने वेंâद्राच्या आदेशाचे पालन करण्याचे वचन त्यांना दिले.

रोज व्हॉटस्अ‍ॅपवरून पाठवल्या जाणाया हजारो मेसेजेसचा उगम शोधण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही. सोशल साइटस्वरील अ‍ॅप्सची मालकी असलेल्या वंâपन्यांकडे त्यासाठीचे तंत्रज्ञान असायलाच हवे-रविशंकर प्रसाद, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री