
सामना ऑनलाईन । नॉटिंगहम
नॉटिंगहम कसोटीत हिंदुस्थानने इंग्लंडचा 203 धावांनी पराभव केला आहे. पाचव्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 317 धावांत संपुष्टात आला. आर. अश्विनने अँडरसनला 11 धावांवर बाद केले, रशिद 33 धावांवर नाबाद राहिला. विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. (पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103)
दरम्यान, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हिंदुस्थानचा हा पहिला विजय आहे. अद्याप दोन सामने बाकी असून इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. चौथा सामना साऊथहॅप्टन येथे 30 ऑगस्टपासून रंगणार आहे.
India win the 3rd Test by 203 runs.#ENGvIND pic.twitter.com/YkNJjsGRlQ
— BCCI (@BCCI) August 22, 2018
हिंदुस्थानने इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे आव्हान ठेवले होते. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 9 बाद 311 धावा केल्या होत्या. रशिद 30 आणि अँडरसन 8 धावांवर नाबाद होते. चौथ्या दिवशी बुमराहने पाच बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. तसेच इशांत शर्माने 2 आणि शमी व पांड्याने प्रत्येकी 1 बळी घेतला. परंतु स्टोक्स आणि बटलरने 169 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा पराभव लांबवला. बटरलने कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले.
धावफलक –
हिंदुस्थान पहिला डाव – सर्व बाद 329 (विराट कोहलीच्या सर्वाधिक 97 धावा)
इंग्लंड पहिला डाव – सर्व बाद 161 (हार्दिक पांड्याचे 5 बळी)
हिंदुस्थानचा दुसरा डाव – 7 बाद 352 धावांवर घोषित (विराट कोहलीच्या सर्वाधिक 103 धावा)
इंग्लंडचा दुसरा डाव – सर्व बाद 317 धावा (जसप्रीत बुमराहचे 5 बळी)
Player of the Match goes to #TeamIndia Skipper @imVkohli.#ENGvIND pic.twitter.com/4MTJj87MmY
— BCCI (@BCCI) August 22, 2018


























































