मुंबईकर पृथ्वी शॉची हिंदुस्थानी संघात एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम

गेल्या दोन मोसमांत धावांचा पाऊस पाडणाऱया मुंबईकर पृथ्वी शॉची हिंदुस्थानी क्रिकेट संघात निवड झाली आहे. अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने नॉटिंगहॅम येथे बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाची निवड केली. पृथ्वी शॉसह हनुमा विहारीलाही संघात स्थान देण्यात आले असून पहिल्या दोन कसोटींत अपयशी ठरलेल्या मुरली विजयसह कुलदीप यादवलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

वयाच्या 14व्या वर्षी त्याने हॅरीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत रिझवीकडून खेळताना 546 धावांची विक्रमी खेळी साकारत साऱयांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. तिथून सुरू झालेला प्रवास नॉनस्टॉप चालू आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि पृथ्वी शॉच्या नेतृत्वात हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने या वर्षी युवा वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली. एवढेच नव्हे तर यंदा ‘हिंदुस्थान अ’ संघाकडून खेळताना त्याने 10 सामन्यांमधून चार शतके व दोन अर्धशतकांसह 759 धावा फटकावल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींसाठी हिंदुस्थानचा संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांडय़ा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, हनुमा विहारी.