भुगोल ऑलिम्पिक स्पर्धेत सरंबळ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे अध्ययन संस्था मुंबई यांच्या वतीने भूगोल ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ मधील इयत्ता आठवी व नववी मधील एकूण 8 विद्यार्थी सहभागी झाले. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यात हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची कु. प्रिया गुंडू रासम, कु. दिप्ती प्रशांत मेस्त्री यांची प्रश्‍नमंजुषेत निवड झाली. उपांत्य व अंतिम फेरीत सर्वांधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला.

अध्ययन संस्थेतर्फे बालम यांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बालम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले संस्थेचे शाखाध्यक्ष व संस्थाध्यक्ष व सरचिटणीस यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सहशिक्षिका सौ. होळकर यांनी विद्यार्थ्यांन मार्गदर्शन केले.