VIDEO: ताडदेव पोलीस लाईनमध्ये स्लॅब कोसळून दोन जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मंबई

मुंबईतल्या ताडदेव पोलीस लाईनमधील एका घरात स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. ताडदेव पोलिस लाईनमधील बिल्डींग नंबर चार मध्ये देवगुडे कुटुंबिय राहत असलेल्या 2 नंबरच्या खोलीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅबचा काही भाग अंगावर पडल्याने रंजना देवगुडे आणि शंकर देवगुडे हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.