विधिमंडळ समितीच्या दिमतीला 27 अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यातील विविध विभागाचा ताळेबंद तपासणीसाठी 27 आमदारांची विधिमंडळ समिती बुधवारी जिल्ह्यात दाखल होत आहे. ही समिती अचानक कोठे ही पाहणीसाठी जाऊ शकते , समितीला प्रशासकीय अडचण येऊ नये यासाठी 27 अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, समितीतील प्रत्येक सदस्यांसाठी एक अधिकारी असणार आहे.

बीड जिल्ह्यातील प्रशासनाची झाडाझडती घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी विधिमंडळ समिती बीड मध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. 27 आमदारांसाठी 27 जिल्ह्यातील अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त केले आहेत, हे अधिकारी समिती निरोप देई पर्यंत त्यांच्या सोबत असणार आहेत. 27 आमदारांसह सचिव स्तरावरील अधिकारी बीड मध्ये दाखल होत आहेत. प्रत्येक विभाग आपल्या खात्यातील त्रुटी दूर करण्याचा कामाला लागले आहेत. एकीकडे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीड मध्ये मुक्कामाला असल्याने या समितीतील काही आमदारांची व्यवस्था बीडच्या विश्रामगृहांमध्ये होऊ शकते. केवळ दहा आमदारांची व्यवस्था विश्रामगृहात करता येईल. उर्वरित आमदाराची व्यवस्था शहरातील हॉटेल मध्ये करावी लागणार आहे. प्रोटोकॉल विभाग यासाठी दिवस रात्र पर्यंत करत आहे.