पोलीस महासंचालक पडसलगीकर यांना सहा महिने मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे येत्या 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असतानाच राज्य व केंद्र शासनाने त्यांना सहा महिने मुदतवाढ दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयपीएस म्हणून पडसलगीकर यांनी 36 वर्षे निष्कलंक सेवा बजावली. अशा या प्रामाणिक व नॉन करप्ट अधिकाऱ्याला सहा महिने मुदतवाढ देण्याचे यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले होते. अखेर केंद्राने त्यास मंजुरी दिल्याने पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर हे पोलीस महासंचालक म्हणून राज्याची धुरा वाहणार आहेत.

पोलीस महासंचालकच्या स्पर्धेत संजय बर्वे ,  बिपीन बिहारी, संजय पांडे आदी ज्येष्ठ अधिकारी होते, परंतु आता त्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पडसलगीकर यांनी मुदतवाढ घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसे त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे बोलूनही दाखवले होते. शासनालाही नकार दिला होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आग्रहामुळे पडसलगीकर यांचा नाइलाज झाला व त्यांनी मुदतवाढ घेण्यास होकार दिला, अशीही माहिती सूत्रांनी दिली.