हिंपळनेरचे तलाठी पुलकुटवार यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चाकूर

चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथील तलाठी राजेश पुलकुटवार (50) यांनी बुधवारी सकाळच्या सुमारास नायगाव जवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. नायगावचे सरपंच रमेश मोगले यांनी या घटनेची माहिती प्रशासनास दिली. त्यानंतर पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

राजेश पुलकुटवार हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते अशी माहिती तहसिलदार भरत सूर्यवंशी यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी चाकूर पोलिसात आकस्मात मृत्युचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.