विधिमंडळ अंदाज समिती झाली हजर, अधिकाऱ्यांची पळापळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य आमदार बुधवारी रात्री उशिरा बीड मध्ये दाखल झाले. उर्वरित काही आमदार सकाळी आले. जिल्हाधिकारी दालनात अधिकाऱ्यांची बैठक उरकून आमदारांची समिती जिल्हाभरातील वेगवेगळ्या कामांची झाडाझडती घेण्यासाठी रवाना झाली मात्र आपल्या अखत्यारीतील कामांकडे ही समिती तर जाणार नाही ना या भीतीने अधिकाऱ्यांची मात्र गाळण उडाली.

बीड जिल्ह्यातील लेखाजोखा आणि ताळेबंद तपासण्यासाठी विधिमंडळ अंदाज समिती ज्या समितीत 27 आमदारांचा समावेश आहे ती समिती रात्री उशिरा आपल्या सोयीने बीड मध्ये दाखल झाली. उर्वरित आमदार सकाळी आले. 27 पैकी किती आमदार बीडच्या पाहणीसाठी आले हा आकडा समजू शकला नाही मात्र गुरूवारी सकाळी अधिकारी आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्याची त्यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर ही समिती वेगवेगळे ग्रुप करून जिल्हाभरात विखुरले. झाडाझडतीसाठी ही समिती रवाना झाली.