आयडियल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची सेलिब्रिटी दहीहंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई  

दादर येथील प्रसिद्ध आयडियल बुक कंपनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  दादर येथे रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी भव्य सेलिब्रिटी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषण आणि अतिरिक्त पाण्याचा वापर टाळून प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर साजरी केली जाणारी ही राज्यातील एकमेव पर्यावरणपूरक दहीहंडी आहे. या दहीहंडी उत्सवासाठी ‘स्टार प्रवाह’ आणि ‘सोनी मराठी’  या वाहिन्यांवरील मालिकांमध्ये काम करणारे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच सालाबादप्रमाणे अनेक कलाकार ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत ही मानाची पार्यावरणपूरक दहीहंडी फोडण्यासाठी थर लावणार आहेत. ‘आयडियल’ हे फक्त पुस्तक विक्री केंद्र नसून तेथे पुस्तक प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन व विक्रीसह विविध संस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. पर्यावरणपूरक दहीहंडी हाही त्याचाच एक भाग आहे.

संपर्क : अनिकेत तेंडुलकर 7738297007.