रॉबर्ट वडेरांविरोधात एफआयआर दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robert-vadra

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुडगावमधील एका जमीन व्यवहारप्रकरणी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा आणि दोन रियल इस्टेट कंपन्यांचीही नावे आहेत. या प्रकरणी वडेरा यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या 420 कलमासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

वडेरा यांची कंपनी स्कायलाइट लिमिटेमार्फत रियल इस्टेट कंपन्यांना जमीन आणि प्रोजेक्टसाठी परवाना देण्याबाबतचे हे प्रकरण आहे. या व्यवहारात वडेरा यांनी 50 कोटींचा लाभ उठविल्याचा आरोप आहे.या तक्रारीच्या आधारावरून भारतीय दंड संहितेचे कलम 420, 120 ब, 476, 468 आणि 471 अन्वये वडेरा यांच्याविरुद्ध केस दाखल केली आहे.