गेवराई तालुक्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाची विष प्राशन करुन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष भोसले । गेवराई

तालुक्यातील ईरगाव येथील अप्पासाहेब सुंदरराव काटे (३२) या तरुणाने १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता  मराठा आरक्षण मिळत नाही म्हणुन विष प्राशन करुन आत्महत्या केली.  दरम्यान पाडळसिंगी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात काटे सहभागी होते. आंदोलन करुनही आरक्षण मिळत नसल्याने अखेर अप्पासाहेब काटे यांनी आपली जीवन यात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेननंतर ईरगाव येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मयताचे प्रेत गेवराई पोलीस ठाण्यात आणले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान मृत अप्पासाहेब काटे विवाहित असुन आई, वडिल, पत्नी, भाऊ व  दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान काटे यांनी एक चिठ्ठी लिहिली असुन त्यात मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे नमुद केले आहे.