मुंबईकर पृथ्वी शॉचा कसोटीत होणार श्रीगणेशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । साऊथम्पटन

मुंबईचा 18 वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉ याचे कसोटी पदार्पण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंडने साऊथम्पटन कसोटी जिंकून पाच सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने खिशात घातल्यानंतर आता पाचव्या कसोटीला तेवढे महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे दोन्ही संघांत बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्यात येईल. सलामीवीर लोकेश राहुल याला आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. तसेच रविचंद्रन अश्विनला दुखापत झाल्यामुळे त्यालाही बाहेरच बसावे लागणार आहे.

वोक्स, पोपची इंग्लंड संघात एण्ट्री
इंग्लंडने हिंदुस्थानविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला. यामध्ये ख्रिस वोक्स व ओलि पोप यांचे संघात पुनरागमन करण्यात आले आहे.