
मयुरी वाघ… तिला आईच्या हातचं काहीही आवडतं. चाट आणि दाक्षिणात्य पदार्थही तिच्या जास्त आवडीचे आहेत. डाएट करते, पण आठवडय़ातून एकदा मनसोक्त खाते.
‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ? – माझ्यासाठी खाणं म्हणजे ‘पोट भरणं’
खायला काय आवडतं ? – आईच्या हातचं काहीही आवडतं. चाट आणि दाक्षिणात्य पदार्थ जास्त आवडतात.
खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ? – घरचं खाते आणि भरपूर पाणी पिते.
डाएट करता का ? – हो, तरीही आठवडय़ातून एकदा ‘चिट मिल’ घेते.
आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता ? – बाहेर खाणं बऱ्याचदा टाळते. जे हवं ते घरीच बनवते, पण कामानिमित्त कधी कधी बाहेर खावंच लागतं.
कोणत्या हॉटेलमध्ये जाता ? – वर्सोव्यातलं बनाना लिफ आणि पुण्यात नागब्रह्म.
कोणतं पेय आवडतं ? – कॉफी प्रचंड आवडते.
प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता ? – प्रयोगावेळी घरून डबा नेते. त्यासोबत सुकामेवा, राजगिरा चिक्की असा सुक्या खाऊचा डबाही सोबत असतोच.
स्ट्रीट फूड आवडतं का ? – हो खूप आवडतं. पण डाएटमुळे त्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणून आठवडय़ातून एकदा चिट डे असता. तेव्हा खात.
घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? – घरचं सगळंच खायला आवडतं.
घरी आलेल्या पाहुण्यांना आवर्जून काय खाऊ घालता ? – वरण भात, वांग्याचं भरीत, डाळिंबी उसळ.
उपवास करता का ? – हो. दर गुरुवारी आणि नवरात्रीतले नऊ दिवस उपास करते.


























































