
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील साखर कारखान्यांनी 2017-18च्या गाळप हंगामात आपल्या क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप केल्याने कारखान्यांच्या परिसरात प्रदूषणाची पातळी वाढली आहे. याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील 60हून अधिक कारखान्यांना नोटीस पाठवून तुमच्यावर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हा दाखल का करू नये, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात 101 सहकारी तर 87 खासगी साखर कारखाने आहेत. त्यांनी मागील गळीत हंगामात 952 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून तब्बल 107 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली आहे. यासाठी अनेक कारखान्यांनी त्यांना परवाना दिलेल्या गाळप क्षमतेहून अधिक उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे परिसरात वाढलेल्या प्रदूषणाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित साखर कारखान्यांना जबाबदार धरले आहे. परिणामी येणाऱ्या गाळप हंगामात अतिरिक्त उसाचे काय करायचे, असा प्रश्न कारखान्यांसमोर उभा राहिला आहे.
summary- sugar cane factories are creating pollution




























































