
सामना ऑनलाईन । मुंबई
पेट्रोल-डिझेलची दरवाढ, प्रदूषणाचा प्रश्न अशा फेऱ्यात अडकल्याने गेली अनेक वर्ष सीएनजी वापराच्या परवानगीसाठी वाट पाहणाऱ्यां सात जिल्ह्यांसाठी खूशखबर आहे. लवकर त्यांना सीएनजी गाड्या वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. या वृत्तानुसार नाशिक, संभाजीनगर, नगर, धुळे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांना सीएनजी गाड्या वापराची परवानगी देण्यात येणार आहे. सीएनजी वापरामुळे प्रदूषण कमी होते, तसेच पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी खर्चात वाहन चावता येते.























































