
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पतंजली नावाचा ब्रँड सुरू करत त्याअंतर्गत शेकडो वस्तू विकणाऱ्या बाबा रामदेव यांनी आता दूधही विकायचा निर्णय घेतला आहे. पतंजलि आता दुधासोबतच दही,ताक आणि जनावरांसाठी खाद्यही विकणार आहे
दिल्लीतील तालकटोरा मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमानंतर या वस्तूंच्या विक्रीला सुरुवात होणार आहे.
कुछ ही घंटों में लॉन्च होने वाला है पतंजलि गाय का दूध और इससे बने शुद्ध उत्पाद। अधिक जानकारी के लिए पतंजलि फेसबुक पेज से जुड़े रहें। #PatanjaliCowMilk pic.twitter.com/Dkd9MhwSYw
— Patanjali Ayurved (@PypAyurved) September 13, 2018
योगगुरू म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या बाबा रामदेव यांनी त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी मिळून पतंजलीचा ब्रँड सुरू केला होता. या ब्रँड अंतर्गत या दोघांनी चारा,दुधासोबतच फ्रोजन भाज्या, सोलार पॅनेल, सोलार लाईट, पिण्याचं फिल्टर केलेलं शुद्ध पाणी विकण्याचं ठरवलं आहे.
पतंजलिची टूथपेस्ट, साबण, आयुर्वेदीक औषधं, बिस्कीटं, मसाले ही उत्पादनं देशभरात बरीच प्रसिद्ध झाली होती. बाबा रामदेव यांनी आता त्यांचा उद्योग आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला असून ते येत्या काही दिवसात आणखी काही उत्पादनं विकणं सुरू करतील असं सांगितलं जातंय
























































