महिलेला अश्लील मेसेज करणाऱ्या विकृताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

एका मिस्ड कॉलनंतर चेंबूर येथे राहणाऱ्या महिलेला अश्लील मेसेज व व्हिडीओ क्लिप्स पाठवून दिल्लीतल्या वॉचमनने त्यांचा छळ चालवला होता. अखेर गोवंडी पोलिसांनी महिलेला त्रास देणाऱ्या त्या भामट्या वॉचमनला बेडय़ा ठोकल्या.

गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुषमा (नाव बदललेले) या महिला राहतात. 7 जून रोजी त्यांच्या मोबाईलवर आरोपीचा एक चुकून कॉल लागला होता. तेव्हा सुषमा फोनवर बोलल्या होत्या. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर आरोपीने त्या नंबरवरील व्हॉटस्अॅप डीपी पाहिला. डीपी सुंदर महिलेचा असल्याचे पाहिल्यानंतर भामटय़ाने सुषमा यांच्या व्हॉटस्अॅपवर अश्लील मेसेज व व्हिडीओ क्लिप्स पाठविण्यास सुरुवात केली. हा प्रकार वाढूच लागल्यानंतर सुषमा यांनी गोवंडी पोलिसांकडे धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, उपनिरीक्षक विकास जाधव, सूरज गायकवाड, अंमलदार निंबाळकर, आहेर या पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून गुह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान फोन नंबरसाठी दिलेला पत्ता हा चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कॉल नंबरचा बारकाईने अभ्यास केल्यावर कॉलर दिल्लीतल्या पहाडगंज येथील एका शाळेचा वॉचमन असल्याचे निष्पन्न झाले. अपूर्वा शहाद बहादूर यादव (20) असे त्या वॉचमनचे नाव असून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तोच सुषमाला अश्लील मेसेज पाठवत असल्याचे स्पष्ट झाले.

summary- pervert got arrested from delhi