
सामना ऑनलाईन, नगर
भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिलाय. खा.दिलीप गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. भाजपच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर त्यांनी पक्षाविरोधात मेसेज टाकले होते. झालेल्या प्रकाराबद्दल मी सर्वांची माफी मागत आहे असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे. लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात शनिवारी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत हा राजीनामा मंजूर करण्यात आला. राजीनामा मंजूर करीत असल्याचे पत्र कार्यालयीन चिटणीस बबन गोसके यांनी गट्टाणींना दिले आहे.




























































