
सामना प्रतिनिधी । पुणे
शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला…वेठीस धरलेल्या विद्यार्थांचे रडणे… आणि इतक्यात आकाशात सुरू होणारी हेलिकॉप्टरची घरघर… त्यातून होणारे सैनिकांचे आगमन… चित्त्याच्या चपळाईने त्यांनी शाळेला दिलेला वेढा… आणि मग झालेली चिमुकल्यांची सुटका… श्वास रोखून धरायला लाकणाऱ्या या लष्करी सरावाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच आणला.
दुसऱ्या प्रसंगात जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाच देशांचे सैनिक एकत्र येऊन नदीतून ‘राफेल’मध्ये बसून जंगलात आले. फक्त पाच सैनिक केवळ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन आगेकूच करीत होते. सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात या सर्वांनी केवळ 11 मिनिटांत डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच 10 ते 15 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हा चित्तथरारक अनुभव आला तो औंध मिलिटरी स्टेशनच्या परिसरातील जंगलात. या ठिकाणी हिंदुस्थानसह ‘बिमस्टेक’ (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्हफॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल ऍण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) गटाच्या देशांच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी ‘मिलेक्स-2018’ हा पहिला संयुक्त लष्करी युद्धसराव सोमवारपासून सुरू आहे. विविध प्रकारच्या ड्रिलच्या माध्यमातून सदस्य देशांच्या लष्करी तुकड्यानी एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा कसा करता येईल याचा सराव सध्या औंध मिलिटरी स्टेशनवर होत आहे. या लष्करी सरावाचा 16 सप्टेंबर अखेरचा दिवस असून यामध्ये हिंदुस्थानसह श्रीलंका, भूतान, म्यानमार, बांगलादेश या राष्ट्रांच्या सैन्यदलांनी भाग घेतला आहे.
‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या सेनाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
‘मिलेक्स-2018’ हा पहिला संयुक्त लष्करी युद्धसराव सोमवारपासून औंध मिलिटरी स्टेशन येथे सुरू असून या सरावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग येथे सदस्य राष्ट्रांच्या सेनाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्या ‘दहशतवाद आणि विविध देशांमधील गुह्यांच्या पार्श्वभूमीकर बिमस्टेक देशांसाठी सुरक्षा आराखडा’ या किषयावरील चर्चासत्रात सदस्य देशांच्या सेनाधिकाऱ्यांनी मते मांडली. हिंदुस्थानचे माजी राजदूत जी. पार्थसारथी हे या बैठकीचे समन्कयक होते. ‘बिमस्टेक’च्या सदस्य राष्ट्रांपैकी नेपाळ आणि थायलंड या देशांनी प्रत्यक्ष सरावात भाग घेतला नसला तरी या देशांचे निरीक्षक उपस्थित आहेत. प्रत्येक देशाकडून 30 सैनिकांची तुकडी यात सहभागी झाली आहे.























































