पार्किंग शुल्कावरून साई भक्ताला शिर्डीत मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

शिर्डी नगरपंचायतीच्या कर वसुली पथकाची दबंगगीरी सुरूच असून पुण्याच्या साईभक्ताला पार्कींग शुल्का वरून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांनी विशाल गायकवाड यांनी शिर्डीत रस्त्यावर गाडी उभी केली त्याचे पार्किंगचे शंभर रूपये मागितले  ते देण्यास  विरोध केल्याने त्यांना मारहाण झाली़. गायकवाड पुण्याहून भाविकांना घेऊन आले होते़. त्यांना दर्शनाला सोडुन ते शहराबाहेरील रींग रोडवर कडेला गाडी लाऊन झोपलेले असतांना हा प्रकार घडला़. माजी नगरसेवक राजेंद्र कोते व डॉ़ सुनील कथले त्या रस्त्याने जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला़. त्यांच्या हस्तक्षेपानंतर वसुली करणारे निघुन गेले़. गायकवाड यांनी या संदर्भात पोलीसात तक्रार दिली आहे़. दोनच दिवसापुर्वी चहा विक्री करणाऱ्या व्यावसाईकाला पावती वरून मारहाण केली होती त्यात आज चक्क साईभक्तांच्या चालकाला मारहाण केल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.