तुमच्या मोबाईलमध्ये कुणी डोकावतंय? मग हे अॅप वापरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ट्रेन, मेट्रो किंवा बसमधून ट्रॅव्हल करताना प्रचंड गर्दीत तुमच्या मोबाईलमध्ये डोकावून बघणारे अनेक जण असतात. जाणता-अजाणता त्यांचं लक्षं तुमच्या मोबाईलमध्ये जातं, मग तुम्हाला अवघडल्यासारखं होतं. मोबाईल युझर्सची हीच अवस्था लक्षात घेऊन एका चाणाक्ष मुंबईकरानं नवं अॅप शोधून काढलं आहे. ‘स्क्रीन शटर’ (ScreenShutter) या अॅपमुळे तुमच्या मोबाईलमधील चॅट, पासवर्ड, खासगी गोष्टी कुणीही वाचू शकत नाही.

screen-shutter

आयटीक्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या नरेंद्र कोथमिरे या तरुणाने ‘स्क्रीन शटर’ हे अॅप बनवलं आहे. रेल्वेने रोज प्रवास करताना आपल्याला ज्या गोष्टी जाणवल्या त्यातूनच या अॅपचा विचार सुचला. गर्दीमध्ये अनेकदा इच्छा असो वा नसो माणसांचं दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लक्ष जातं. कधी-कधी तुमच्या खासगी संभाषणात ही मंडळी कळत नकळत ‘कबाब मे हड्डी’ बनून जातात आणि मग नाईलाजाने तुमचं संभाषण अर्धवट संपवून मोबाईल ठेवून द्यावा लागतो. अशी गैरसोय होऊ नये म्हणूनच हे अॅप बनवले आहे, असे नरेंद्र कोथमिरे सांगतात. हे अॅप वापरणं अगदी सोपं आहे. यात तुम्हाला स्क्रीन शटरसाठी दोन रंगांपैकी कोणताही रंग निवडता येतो. लवकरच या अॅपमध्ये काही नवीन फिचर्स देखील अॅड होणार आहेत. तसेच अॅप संदर्भात आणखी काही सूचना असतील तर त्या देखील तुम्ही प्ले-स्टोअरच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता.

गुगल प्लेस्टोअरवरून हे अॅप डॉऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.