
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६८वा वाढदिवस सोमवारी साजरा झाला. पण त्या पूर्वी आठवडाभर आधी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पंतप्रधानांना ‘काका मोदी’ असं म्हणण्याचं प्रशिक्षण दिलं गेल्याचं समोर आलं आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पंतप्रधान त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत दाखल झाले होते. तिथे त्यांनी लहान मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. नारौर येथील प्राथमिक शाळेतील तब्बल २०० मुलांनी त्यांना यावेळी काका मोदी असं म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माध्यमांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. त्यातील एका पालकाने याची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू असल्याचं सांगितलं.
पालकांच्या आठवडाभर काही लोक शाळेत येऊन मुलांना चांगल्या सवयी शिकवत होते. याचसोबत ते पंतप्रधांनाचं स्वागत कसं करावं, त्यांना काय हाक मारावी, याचंही प्रशिक्षण दिलं. त्यांनीच विद्यार्थ्यांना पंतप्रधानांना काका मोदी असं म्हणायला सांगितल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
summary- students got trained to call kaka modi
























































